अवकाळी पावसाचे ढग सरले
By admin | Published: February 14, 2015 11:50 PM
तापमानात घट : हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यावर घोंगावणारे अवकाळी पावसाचे ढग शनिवारी सरले. राज्यातील ढगाळ हवामान गायब होताच काही भागांच्या तापमानात थोडी घट झाली.विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांचे तापमान सरासरीच्या खाली गेले होते. राज्यात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. बंगालच्या उपसागरात निर्माण ...
तापमानात घट : हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यावर घोंगावणारे अवकाळी पावसाचे ढग शनिवारी सरले. राज्यातील ढगाळ हवामान गायब होताच काही भागांच्या तापमानात थोडी घट झाली.विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांचे तापमान सरासरीच्या खाली गेले होते. राज्यात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या प्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडला होता. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वादळी वार्यासह गारपिटही झाली होती. त्यामुळे राज्यातून थंडी गायब झाली होती. कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने उकाडा जाणवत होता. शुक्रवारी बंगालच्या उपसागरातील हवेचा कमी दाबाचा पा विरल्याने अवकाळी पावसाचे सावट दूर झाले. पुढील ४८ तास राज्याचे हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)----------------------प्रमुख शहरांमधील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : अकोला १३.२, बुलडाणा १४.२, वाशिम १९.८,पुणे १२.५, अहमदनगर १३.१, जळगाव १२.२, कोल्हापूर १७, महाबळेश्वर १५, मालेगाव १३.४, नाशिक १०.४, सांगली १६.७, सातारा १३.९, सोलापूर १८.१, मुंबई २०.८, अलिबाग १७.६, रत्नागिरी १७.१, डहाणू १५.९, भिरा १३, उस्मानाबाद १४.९, औरंगाबाद १३.४, परभणी १५.५, नांदेड १४, बीड १५, अमरावती १४.२, ब्रम्हपुरी १४.१, चंद्रपूर १४.६, नागपूर १२.२, वर्धा १३.२, यवतमाळ १२.२. -----