लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना फोन करून संसदेच्या संकुलातील काही खासदारांनी त्यांची नक्कल केल्याबद्दल तीव्र वेदना व्यक्त केल्या. ‘मी वीस वर्षांपासून असा अपमान सहन करत आहे आणि अजूनही तसेच होत आहे. परंतु, उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक पदाबाबत आणि तेही संसदेत असे घडू शकते, हे दुर्दैवी आहे,” असे मोदी म्हणाले. धनखड यांची नक्कल करत अपमान करण्यात आल्याने खूप दुःख झाले झाले असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे.
धनखड यांनी पंतप्रधानांना सांगितले, “अशा घटना त्यांना त्यांचे कर्तव्य करण्यापासून आणि आपल्या राज्यघटनेतील तत्त्वांचे पालन करण्यापासून रोखू शकत नाहीत. मी माझ्या हृदयाच्या तळापासून त्या मूल्यांसाठी वचनबद्ध आहे. कोणताही अपमान मला माझा मार्ग बदलण्यास भाग पाडणार नाही.”
लोकसभा अध्यक्ष-धनखड भेट
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची भेट घेतली. त्यांनी गंभीर गैरवर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली.
नक्कल केल्याबद्दल पोलिसांत तक्रारतृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात एका वकिलाने संसदेच्या संकुलात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, ॲड. अभिषेक गौतम यांनी मंगळवारी संध्याकाळी डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आम्ही ती नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडे पाठवली आहे. गौतम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, हा व्हिडीओ भारताचे उपराष्ट्रपती, त्यांची जात याचा अपमान आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता.
अनादर करण्याचा हेतू नव्हता तृणमूल खासदाराचा उपराष्ट्रपतींचा अनादर करण्याचा हेतू नव्हता. आम्ही सर्वांचा आदर करतो. हे कोणाचाही अनादर करण्यासाठी नव्हते. हे राजकीय आणि अनौपचारिकपणे घेतले पाहिजे. राहुलजींनी ते रेकॉर्ड केले नसते तर तुम्हाला याबद्दल माहीत देखील झाले नसते.- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल