शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे २५२५ कोटी थकवले

By admin | Published: February 25, 2015 1:55 AM

ऊस उत्पादकांना वेळेत मालाची उचल देण्यासाठी केंद्र सरकारकडून नाममात्र व्याजदरांवर हजारो कोटींचे कर्ज लाटूनही अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उचलेची रक्कम दिलेली नाही़

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीऊस उत्पादकांना वेळेत मालाची उचल देण्यासाठी केंद्र सरकारकडून नाममात्र व्याजदरांवर हजारो कोटींचे कर्ज लाटूनही अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उचलेची रक्कम दिलेली नाही़खासदार राजू शेट्टी आणि कोथापल्ली गीता यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल खुद्द ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच ही माहिती दिली आहे़ शेतकऱ्यांना वेळेत उचल देण्याच्या नावावर देशभरातील साखर कारखान्यांनी ६,६५५़१० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे़ मात्र असे असूनही २०१३-१४ च्या गळीत हंगामात खरेदी केलेल्या उसाची २५२५़८७ कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही़ विशेष म्हणजे स्वस्त व्याज दरावर कर्ज घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे़ ऊस उत्पादकांना उचल देण्यासाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना २०७० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज मंजूर केले गेले आहे़ यापैकी २०४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे प्रत्यक्ष वाटपही झाले आहे़ महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशच्या साखर कारखान्यांनाही सर्वाधिक १९५५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे़ यापैकी १८६४ कोटींच्या कर्जाचे वाटप झाले आहे़दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी २०१४ पासून साखर कारखान्यांना स्वस्त व्याजदराने कर्जाचे वाटप सुरू आहे़ यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाला नोडल बँक बनविण्यात आले आहे़ या कर्जाचा वापर शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी देण्याशिवाय अन्य दुसऱ्या कामासाठी करता येणार नाही, अशी मुख्य अट आहे़ मात्र असे असूनही अनेक शेतकऱ्यांना आपल्या मालाचा परतावा मिळालेला नाही़ ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ अंतर्गत ऊस उत्पादकांना त्यांच्या मालाची किंमत वेळेत चुकती केली जावी, अशी तरतूद आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकारची जबाबदारी आहे़