नवी दिल्ली : राज्य सरकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार चालू विपणन वर्षात देशात साखरेचे उत्पादन 4 टक्क्यांनी वाढून 2.55 कोटी टन होण्याची शक्यता आहे. साखरेचे उत्पादन करणा:या प्रमुख राज्यांच्या ऊस आयुक्तांच्या केंद्रीय खाद्य मंत्रलयातील अधिका:यांबरोबर झालेल्या बैठकीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
खाद्य सचिव सुधीर कुमार यांनी उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी आम्ही लवकरच गाळप सुरू करीत आहोत, असे आश्वासन साखर आयुक्तांना दिले असे सांगितले. यावर्षीच्या साखर उत्पादनाबद्दल सुधीर कुमार यांनी संकटाची कोणतीही परिस्थिती नसल्याचा दिलासा दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन काही लाख टनांनी जास्तच असेल. गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन 2.45 लाख टन होते. साखरेचे विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर असे असते.
महाराष्ट्रात साखर उत्पादन 91 लाख टन, उत्तर प्रदेशात 62 आणि कर्नाटकात 42.5 लाख टन होण्याची अपेक्षा आहे. खासगी साखर कारखान्यांच्या संघानेही उत्पादन 2.5क् ते 2.55 कोटी टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे साखर आयुक्त सुभाष चांद यांनी सांगितले की, काही सहकारी साखर कारखाने आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील खासगी साखर कारखाने 1क् नोव्हेंबरपासून गाळप सुरू
करतील व इतर कारखान्यांचे गाळप नोव्हेंबरच्या तिस:या आठवडय़ात सुरू होईल.
हुडहुड वादळामुळे उत्तर प्रदेशात काही भागातील ऊस तोडणीचे काम उशिरा सुरू झाले. यावर्षी सरकारला 119 साखर कारखाने गाळप सुरू करतील अशी आशा आहे. दक्षिण कर्नाटकातील 14 कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)