नवी दिल्ली : येत्या १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून करायच्या भाषणासाठी जनतेने आपल्याला मुद्दे, विषय आणि कल्पाना सुचवाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. ट्विटरवरून हे आवाहन करताना मोदींनी लिहिले की, १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करीन तेव्हा मी फक्त माध्यम असेन. प्रत्यक्षात ते भाषण १२५ कोटी भारतीय नागरिकांच्या मनातील विचार असतील.ज्याचा देशाला फायदा होईल अशी आपल्याला एखादी कल्पना सुचवायची असेल तर ती जरूर सुचवा आणि ‘नवभारता’च्या उभारणीत सहभागी व्हा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. यासाठी आपल्या ‘एनएम अॅप’वर एक खास ‘फोरम’ तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून लोक आपले विचार माझ्यापर्यंत पोहोचवू शकतात. लोकांकडून येणाºया निवडक माहितीचा भाषणात नावानिशी उल्लेखासह संदर्भ दिला जाईल, असेही मोदी यांनी नमूद केले. या टिष्ट्वटसोबत लोकांनी आपली मते कुठे पाठवावी, यासाठी लिंकही दिली आहे.रविवारी ‘आकाशवाणी’वरील ३४व्या ‘मन की बात’मध्येही मोदी यांनी जनतेला अशाच प्रकारचे आवाहन केले होते.
लाल किल्ल्यावरून काय बोलू ते सुचवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:39 AM