सुहास महाजन बिनविरोध पीपल्स बँक निवडणूक : अंतिम यादी आज जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2016 12:10 AM
जळगाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. उमेवादरी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चार अर्ज आले आहेत. त्यामुळे १४ जागांसाठी २४ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वसाधारण जिल्ाबाहेरील संचालकपदासाठी सुहास बाबूराव महाजन यांचा एकमेव अर्ज आल्याने ही जागा बिनविरोध ठरली आहे.
जळगाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. उमेवादरी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चार अर्ज आले आहेत. त्यामुळे १४ जागांसाठी २४ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वसाधारण जिल्ाबाहेरील संचालकपदासाठी सुहास बाबूराव महाजन यांचा एकमेव अर्ज आल्याने ही जागा बिनविरोध ठरली आहे.जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुकीसाठी सोमवारी २० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. मंगळवार २२ रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी होती. मंगळवारी गोपाल शालीग्राम काळे, चंद्रशेखर देवीदास अत्तरदे व पंडित काशीनाथ चौधरी (पाटील) यांनी सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर ज्ञानेश्वर वामन नाईक यांनी अनुसूचित जाती/जमाती या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एक जागा झाली बिनविरोधजळगाव जिल्ाबाहेरील मात्र बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या सर्वसाधारण गटातून सुहास बाबूराव महाजन यांचा एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आला आहे. त्यामुळे ही जागा बिनविरोध ठरली आहे. अधिकृत घोषणा उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे १३ जागांसाठी आता २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्जांची आज छाननीनिवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल असलेल्या उमेदवारी अर्जाची बुधवारी छाननी होणार आहे. त्यानंतर उमेदवारांबाबत कुणाच्या हकरती असल्यास त्या ऐकून घेण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उमेदवारांची अंतिम यादी लावण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याबाबत प्रयत्न सुरू होण्याची शक्यता आहे.१४ हजार सभासद करणार मतदानजळगाव पीपल्स बँकेला रिझर्व्ह बँकेने १९८४ मध्ये बँकिंग लायसन्स परवाना पीपल्स बँकेला प्रदान केला. सद्यस्थितीला बँकेचे १३ हजार ७९६ वैयक्तिक सभासद आहेत. तर ३८८ फर्मचे सभासद आहेत. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १४ हजार १८४ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत.