आत्महत्येची मागितली परवानगी
By admin | Published: March 15, 2016 12:33 AM
जळगाव- सामरोद ता.जळगाव येथे आपली जमीन शासनाने संपादित केली, पण तिचा परिपूर्ण मोबदला दिला नाही. याबाबत न्यायालयीन लढाई लढून सुरू आहे. जि.प.तर्फे देय असलेला मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आता न्याय मिळत नसेल तर मंंत्रालयासमोर आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्या, अशी मागणी सामरोद ता.जळगाव येथील शेतकरी प्रल्हाद वंजारी यांनी मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.
जळगाव- सामरोद ता.जळगाव येथे आपली जमीन शासनाने संपादित केली, पण तिचा परिपूर्ण मोबदला दिला नाही. याबाबत न्यायालयीन लढाई लढून सुरू आहे. जि.प.तर्फे देय असलेला मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आता न्याय मिळत नसेल तर मंंत्रालयासमोर आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्या, अशी मागणी सामरोद ता.जळगाव येथील शेतकरी प्रल्हाद वंजारी यांनी मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. वंजारी यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, माझी सामरोद येथे आहे. ती शासनाने संपादित केली. हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. या कामासाठी जि.प.च्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांना न्यायालयात बोलावणे आले, पण ते कधी उपस्थित राहत नाहीत. भरपाई मिळावी यासाठी लोकशाही दिनात अर्ज दाखल केले, पण त्याचीही दखल जि.प.तील अधिकारी घेत नाहीत. यामुळे मोबदला मिळण्यास अडचण आहे. या स्थितीत आत्महत्या करू नये तर काय करावे, असेही वंजारी यांनी म्हटले आहे.