- सुरेश एस. डुग्गरश्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम आणि श्रीनगर येथे सुरक्षा दलांसाेबत झालेल्या दाेन चकमकींमध्ये हिज्बुल मुजाहिदीनच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा येथे २०१९ मध्ये झालेल्या भीषण हल्ल्याप्रमाणेच श्रीनगरमध्ये आत्मघाती हल्ला करण्याची जबाबदारी यांपैकी एकावर साेपविण्यात आली हाेती. पुलवामा येथील हल्लेखाेरांपैकी एकाचा ताे नातेवाईक असल्याचा खुलासा सुरक्षा दलांनी केला आहे. त्याचा खात्मा करून सुरक्षा दलांनी माेठा कट उधळून लावला आहे.
कुलगामच्या चावलगाममध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली हाेती. त्यानंतर सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पाेलिसांच्या विशेष कृती पथकाने शाेधमोहीम सुरू केली हाेती. त्यांची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गाेळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. गुरुवार (दि. ११) पासून ही चकमक सुरू हाेती.
गुरुवारी एक दहशतवादी ठार झाला हाेता; तर दुसऱ्याला शुक्रवारी सकाळी यमसदनी धाडले. त्यांच्याकडून एके रायफलसह दारूगाेळा जप्त करण्यात आला आहे. काश्मीरचे पाेलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. तर श्रीनगर येथे आमीर रियाज नावाच्या तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा केला. या दहशतवाद्याची पुलवामाप्रमाणेच माेठा दहशतवादी हल्ला करण्याची याेजना हाेती. त्यासाठीच ताे श्रीनगरला आल्याची माहिती विजय कुमार यांनी दिली.
पुलवामाप्रमाणे हल्लाकरणार हाेता आमीर
आमीर रियाज हा मुजाहिदीन गझवातुल हिंद या स्थानिक दहशतवादी संघटनेचा सदस्य हाेता. पुलवामा येथे सीआरपीएफवर हल्ला करणाऱ्यांपैकी तीन जण या संघटनेचे सदस्य हाेते. त्यांपैकी एकाचा हा नातेवाईक हाेता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले हाेते. आमीरवर काश्मीरमध्ये त्यासारख्याच माेठ्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी देण्यात आली हाेती. सुरक्षा दलांवर किंवा गर्दीच्या ठिकाणी ताे माेठा घातपात घडविण्याच्या तयारीत हाेता.
बेरोजगारांना ‘तो’ हेरायचा...
दाेन दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीनचे हाेते. त्यापैकी एक जिल्हा कमांडर हाेता. शिराज माैलवी असे त्याचे नाव आहे. ताे २०१६ पासून दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला हाेता. तरुणांच्या भरतीची जबाबदारी त्याच्यावर हाेती. काश्मीर खाेऱ्यातील बेराेजगार तरुणांना यासाठी ताे हेरायचा. शिराजने अनेक नागरिकांचीही हत्या केली आहे. तर यावर भट असे दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे. ताे काही महिन्यांपूर्वीच सक्रिय झाला हाेता.