उत्तर प्रदेशच्या इलाहाबाद हायकोर्टाने एका खटल्यात युवकावर लावलेला हुंडाबळी आणि हत्येचा आरोप फेटाळण्यास नकार दिला आहे. या व्यक्तीने स्वत:वरील आरोप चुकीचे असून हायकोर्टात याचिका दाखल केली होती जी कोर्टाने चुकीची ठरवली आणि ही याचिका फेटाळून लावली. प्रयागराजचा आदर्श यादव एका युवतीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. आदर्शसोबत राहणाऱ्या युवतीने सुसाईड केली त्यात तिचा जीव गेला.
या युवकावर पोलिसांनी हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा आरोप लावला. मात्र मी या महिलेचा पती नाही माझ्यावरील गुन्हे खोटे आहेत असं सांगत युवकाने हायकोर्टात याचिका दाखल केली. या प्रकरणी इलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश राजबीर सिंह यांनी सांगितले की, भलेही कायद्यानुसार तुमचं लग्न झालं नव्हते परंतु रेकॉर्डनुसार दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आरोपीवर हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा गुन्हा दाखल करणं योग्य मानलं आहे. आरोपी आदर्शने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी युवती आधीच विवाहित होती. तिने तिच्या पहिल्या पतीशी घटस्फोट घेतला नव्हता. आम्ही दोघे एकत्र राहत होतो, परंतु लग्न केले नाही. त्यात या खटल्यात कोर्टाने स्पष्ट केले की, युवतीकडून मिळालेल्या तक्रारीत तिने पहिल्या पतीशी घटस्फोटाचे सर्व पुरावे दिले आहेत.
युवती तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर याचिकाकर्त्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. युवतीने याचिकाकर्त्याच्या खोलीत सुसाईड केले होते. युवतीकडून मृत्यूपूर्वी दाखल तक्रारीत तिने याचिकाकर्त्यासोबत कोर्टात लग्न केले होते असं म्हटलंय. कोर्टाने या खटल्यावर टिप्पणी करताना सांगितले की, भलेही कायदेशीररित्या तुमचे लग्न झाले नसले हे स्पष्ट होत नाही तरीही याचिकाकर्त्यावर लावलेले आरोप रद्द करता येऊ शकत नाही.
हुंड्यासाठी करायचा छळ
प्रयागराजच्या कोतवाली येथे २०२२ मध्ये युवकाविरोधात हुंड्यासाठी छळ हा गुन्हा नोंद झाला होता. लग्नासाठी हुंड्याची मागणी करणे याला कंटाळून युवतीने आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार्जशीट दाखल केली. ट्रायल कोर्टाने गुन्ह्यातून मुक्त करण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर युवकाने त्याला हायकोर्टात आव्हान दिले.