नवविवाहितेची गळफास घेवून आत्महत्या
By admin | Published: December 28, 2015 12:05 AM
जळगाव: प्रजापत नगरात माहेरी आलेल्या पुजा अजय राजपुत (वय २३ ) या नवविवाहितेने रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुजा हिचे सहा महिन्यापुर्वीच लग्न झालेले होते. उत्तर प्रदेशात तिला दिलेले होते. दिवाळीपासून ती माहेरीच होती. आई व वडील हे झाशी येथे मतदानाला गेले होते तर घरी भाऊ अमितकुमार रामचंद्र राजपुत व लहान बहिण असेच होते. शनिवारी रात्री जेवण आटोपून भाऊ दुसर्या खोलीत तर पुचा व तिची लहान बहिण एका खोलीत झोपले होते.सर्व जण झोपले असता पुजा सकाळी चार वाजता उठली व साडी घेवून स्वयंपाक घरात गेली. तेथे छताला साडी अडकवून तिने आत्महत्या केली. लहान बहिण ही चार वाजता उठली होती, परंतु काही कामासाठी ती किचनमध्ये गेली असावी म्हणून तिने त्याकड
जळगाव: प्रजापत नगरात माहेरी आलेल्या पुजा अजय राजपुत (वय २३ ) या नवविवाहितेने रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुजा हिचे सहा महिन्यापुर्वीच लग्न झालेले होते. उत्तर प्रदेशात तिला दिलेले होते. दिवाळीपासून ती माहेरीच होती. आई व वडील हे झाशी येथे मतदानाला गेले होते तर घरी भाऊ अमितकुमार रामचंद्र राजपुत व लहान बहिण असेच होते. शनिवारी रात्री जेवण आटोपून भाऊ दुसर्या खोलीत तर पुचा व तिची लहान बहिण एका खोलीत झोपले होते.सर्व जण झोपले असता पुजा सकाळी चार वाजता उठली व साडी घेवून स्वयंपाक घरात गेली. तेथे छताला साडी अडकवून तिने आत्महत्या केली. लहान बहिण ही चार वाजता उठली होती, परंतु काही कामासाठी ती किचनमध्ये गेली असावी म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी पाच वाजता उठल्यावर ती छताला लटकलेली दिसली. भाऊ अमितकुमार याने तालुका पोलिसांना ही घटना कळविल्यानंतर पोलीस कर्मचारी एस.पी.बोरसे व सहकार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिचे आई वडील आल्यावरच त्याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. राजपूत यांचा कुल्फी विक्रीचा व्यवसाय आहे.