विद्यमान केंद्र सरकारच्या काळात वाढल्या आत्महत्या; ९,५२,८७५ लोकांनी संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:46 AM2021-11-08T08:46:53+5:302021-11-08T08:46:58+5:30

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : देशभरात  विद्यमान सरकारच्या काळात २०१४ ते २०२० दरम्यान आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, या ...

Suicides increased during the tenure of the present Central Government | विद्यमान केंद्र सरकारच्या काळात वाढल्या आत्महत्या; ९,५२,८७५ लोकांनी संपविले जीवन

विद्यमान केंद्र सरकारच्या काळात वाढल्या आत्महत्या; ९,५२,८७५ लोकांनी संपविले जीवन

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : देशभरात  विद्यमान सरकारच्या काळात २०१४ ते २०२० दरम्यान आत्महत्येच्या घटना वाढल्या असून, या सहा वर्षांत शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, शेतमजूर आणि गृहिणी व रोजंदारी मजुरांसह ९,५२,८७५ लोकांनी  आत्महत्या केल्या, असे   राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालात म्हटले आहे.

एनसीआरबीच्या या खळबळजनक अहवालावरून काँग्रेसनेकेंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढविला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना आत्महत्या करण्यास विवश झाले. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी कोणत्या कारणामुळे या लोकांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, त्याचाही पाढा वाचला. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे देशातील अनेक राज्यांतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. याला केंद्राची धोरणे जबाबदार असल्याची टीकाही केली आहे.

काँग्रेसने केली सरकारवर टीका

काँग्रेसच्या आरोपानुसार २०१४ च्या तुलनेत २०२० मध्ये   १६ टक्के प्रेमीलोकांनी आत्महत्या केल्या. एकूण आत्महत्या करणाऱ्यांत गृहिणींची संख्या १,५२,१२७ आहे. लोकांची स्थिती सुधारण्याएवेजी  सरकार लोकांना मृत्यूचा मार्ग पत्करण्यास भाग पाडण्याचे धोरण राबवित आहे, हे देशासाठी धोकादायक संकेत आहेत.

Web Title: Suicides increased during the tenure of the present Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.