नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट करण्यासाठी वापरलेल्या ‘स्पाईस-२०००’ बॉम्बनी एसयू-३० एमकेआय (सुखोई) लढाऊ विमानांचा ताफाही सुसज्ज करण्याचे काम हाती घेण्यात आले असून ते पूर्ण झाल्यावर भारतीय हवाईदलाच्या मारकशक्तीस दुप्पट बळकटी येईल.इस्राएलकडून घेतलेले लक्ष्याचा अचूक वेध घेणारे ‘स्पाईस-२०००’ बॉम्ब सध्या हवाईदलातील फक्त मिराज विमानांवर बसविण्यात आलेले आहे. बालाकोट हल्ल्यातही मिराज विमानानेच हे बॉम्ब तेथे टाकले होते. परंतु आता सुखोई विमानांवरही हे बॉम्ब बसविण्यात येतील. सूत्रांनुसार भारताने इस्राएलकडून ‘स्पाइस-२०००’ प्रकारचे २०० बॉम्ब खरेदी केले आहेत. हा बॉम्ब सुखोई विमानावर बसवून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेण्याच्या काही चाचण्या अलिकडेच घेण्यात आल्या.
सुखोई लढाऊ विमान होणार ‘स्पाईस’ बॉम्बने सुसज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:46 AM