मध्य प्रदेशच्या सीवनी जिल्ह्यातील घंसौर तालुक्यात राहणाऱ्या सुमित विश्वकर्मानं यूपीएससी परीक्षेत ५३ वा क्रमांक मिळवल्याची बातमी 'लोकमत डॉट कॉम'ने ९ एप्रिल रोजी दिली होती. परंतु, सुमित विश्वकर्माने नव्हे, तर सुमित कुमारने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं आहे.
सुमित कुमार हा बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सिंकद्रा येथे राहतो. तो इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेस येथे ऑफिसर ट्रेनी म्हणून काम करायचा. तो यूपीएससी परीक्षेत देशात ५३ वा आला आहे.
'लोकमत'ने सुमित विश्वकर्माबाबतचं वृत्त एका हिंदी वेबसाइटवरील बातमीवरून केलं होतं. अनेक वेबसाइट्सनी ही बातमी दिली होती. सुमित विश्वकर्माची मुलाखतही प्रक्षेपित केली होती. परंतु, त्यानंतर सुमित कुमारनंच ही चूक ट्विटरवरून निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आम्ही हा खुलासा करत आहोत.