लोकसभाध्यक्षपदी एकमताने निवड : अपेक्षापूर्तीचे आव्हान स्वीकारणार
नवी दिल्ली : गेल्या लोकसभेत सरकार आणि विरोधकांमधील ताणलेल्या संबंधांमुळे सभागृहाच्या कामकाजाचे शेकडो तास वाया गेल्याच्या पाश्र्वभूमीवर नव्या लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनी सर्वपक्षीय समन्वयातून कामकाज सुरळीत चालविण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी जबाबदारी मी आव्हान म्हणून स्वीकारत असून, सभ्यता राखत तरीही ठामपणो सभागृहाचे कामकाज योग्यरीत्या चालवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 71वर्षीय महाजन यांनी इंदूर मतदारसंघातून सलग आठ वेळा निवडून येत अशी कामगिरी नोंदविणा:या पहिल्या महिला खासदार होण्याचा इतिहास रचला आहे. लोकसभेचे अध्यक्षपद चार वेळा महाराष्ट्राच्या वाटय़ाला आले. त्यापैकी मराठवाडय़ातील शिवराज पाटील वगळता दादासाहेब मावळंकर, मनोहर जोशी आणि सुमित्र महाजन या तिघांची जन्मभूमी कोकण आहे.
सुमित्र महाजन यांच्या लोकसभाध्यक्षपदाच्या निवडीवर शुक्रवारी औपचारिकरीत्या शिक्कामोर्तब झाले. हे मानाचे पद दुस:यांदा एका महिला खासदाराकडे चालून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवाणी, अनंत गीते, एम. थंबीदुराई यांनी महाजन यांना लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे नेले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. विरोधी पक्षांचे नेते मल्लिकाजरुन खरगे, मुलायमसिंह यादव, सुदीप बंडोपाध्याय, संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू हेही त्यांच्यासोबत होते. लोकसभा अध्यक्षांची निवड अविरोध करण्याची परंपरा कायम राखत सर्व पक्षांनी समर्थन दिल्याबद्दल मोदींनी सर्व सदस्यांचे आभार मानतानाच महाजन यांचे अभिनंदन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नवी जबाबदारी टाकली
‘‘माङयासाठी पहिली पोळी बनविणो म्हणा किंवा पहिली निवडणूक, एक आव्हानच होते. आता माङयावर पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे.’’