सारांश
By admin | Published: June 26, 2015 1:05 AM
कमला नेहरू महाविद्यालयात योगदिन
कमला नेहरू महाविद्यालयात योगदिन नागपूर : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कमला नेहरू महाविद्यालयात अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा सुहासिनी वंजारी, संस्थेचे सचिव अभिजित वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली योगदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद शेंडे, डॉ. प्रदीप दहिकर, डॉ. जिवेश पंचभाई प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी योगाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानसाधना करण्याच्या पद्धतींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ----शालांत परीक्षेत सिद्धेश्वर विद्यालयाचे यश नागपूर : सिद्धेश्वर विद्यालय, मानेवाडा रोड येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे. यावर्षी शालांत परीक्षेला १२४ विद्यार्थ्यांमधून ११२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल ९० टक्के लागला आहे. शाळेतील २९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ४० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संकेत गोडे याने शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला. मुख्याध्यापिका मालती भेदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.