सारांश
By admin | Published: August 11, 2015 10:11 PM
शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा
शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावानागपूर : शिक्षण क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे. शिक्षकांना वर्तमान पिढीसोबत जोडण्याचे आवाहन शिक्षकांपुढे आहे. त्यामुळे शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे मत शिक्षणविचारक डॉ. विजेंद्र सोलंकी यांनी व्यक्त केले. आदर्श विद्या मंदिर शाळेत डिजिटल सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कालिंदी शाह, रामरतन सारडा, अशोककुमार कोठारी, ब्रिजलाल सारडा, दामोदर चांडक, गोविंदलाल सारडा आदी उपस्थित होते. अजनी रेल्वे पुलाचे चौपदरीकरण होणारनागपूर : अजनी रेल्वे पुलाचे आयुष्य संपुष्टात आले आहे. पुलावरील प्रचंड रहदारी लक्षात घेता, रामझुल्याच्या धर्तीवर नवीन चारपदरी पूल बांधण्याची मागणी कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी महापालिकेला केली होती. या पुलाचे चौपदरीकरण करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली असून, त्यानंतर पुढील कारवाई करण्याचे मनपाचे शहर अभियंता यांनी क ळविले. रंगनाथन यांनी आपले आयुष्य ग्रंथालयाच्या विकासासाठी वेचलेनागपूर : सर्वसामान्य जनतेला ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करून द्यायला हवीत, हा विचार घेऊन ग्रंथालयाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य डॉ. रंगनाथन यांनी केले. त्यामुळे त्यांना ग्रंथालयशास्त्राचे जनक मानल्या जाते. विदर्भ साहित्य संघाच्यावतीने डॉ. रंगनाथन यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शासकीय विज्ञान संस्थेचे ग्रंथपाल डॉ. रामदास लिहितकर यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना मत व्यक्त केले. यावेळी अनिल इंदाने, रामराव तायडे आदी उपस्थित होते.