ग्रामीण हॅलो पान २ साठी सारांश पा
By admin | Published: August 13, 2015 10:34 PM
शावळ येथे मोफत सर्वरोग निदान शिबीर
शावळ येथे मोफत सर्वरोग निदान शिबीरअक्कलकोट : तालुक्यातील शावळ येथे ब्रालिंगेश्वर कृषी भांडार व नर्मदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे १५ ऑगस्ट रोजी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती नामदेव पवार, सुरेश माने, भरमण्णा पुजारी यांनी केले आहे़ या शिबिरात सोलापुरातील डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत़ त्यानंतर रुग्णांना औषधे देणार आहेत़ राष्ट्रीय विश्वकर्मा विकास फाउंडेशनतर्फे स्नेहमेळावावडशिवणे : राजुरी (ता़ करमाळा) येथे राष्ट्रीय विश्वकर्मा विकास फाउंडेशनतर्फे स्नेहमेळावा घेण्यात आला़ यावेळी ह़भ़प़ हनुमंत राऊत, रेवन्नाथ टकले, नागनाथ मोरे, बाळासाहेब सुतार, पांडुरंग क्षीरसागर, पांडुरंग सुतार, संतोष महामुनी, तुकाराम सुतार, ज्ञानेश्वर सुतार, सुनील लोंढे, अमोल भांडवलकर, गणेश जाधव आदी उपस्थित होते़इंदिरानगर जि़ प़ शाळेची क्षेत्र भेटवडवळ : मोहोळ तालुक्यातील इंदिरानगर (कामती खु़ ) जि़ प़ शाळेने परिसर भेट विषयांतर्गत सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिर व परिसरात क्षेत्रभेट दिली़ याप्रसंगी विद्यार्थ्यांना निरीक्षणातून माहिती देण्यात आली़ यावेळी मुख्याध्यापिका अनिता वसेकर, अलका भालेकर यांच्यासह पालक सदस्य उपस्थित होते़बाळे ते बार्शीनाका रस्ता दुरुस्तीची मागणीसोलापूर : बाळे ते बार्शी नाका या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे वाहन चालविताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो़ या खड्ड्यामुळे अनेक अपघातही घडले आहेत़ त्यामुळे बांधकाम विभागाने हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी अण्णाभाऊ साठे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत तांबे यांनी केली आहे़