सारांश बातम्या.....
By admin | Published: July 08, 2015 11:45 PM
मोकळ्या मैदानांवरील सुनावणी तहकूब
मोकळ्या मैदानांवरील सुनावणी तहकूबनागपूर : शहरातील नाहीशा होत असलेल्या मोकळ्या मैदानांची दखल घेऊन हायकोर्टाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. शासनाच्या विनंतीवरून बुधवारी या प्रकरणावरील सुनावणी एक आठवडा तहकूब करण्यात आली. शहरातील काही मैदाने मनपा तर काही मैदाने नासुप्रच्या अधिकारक्षेत्रात आहेत. मैदानांवरील बांधकामांना अवैधपणे नियमित केले जात आहे.मेहंदीबाग रेल्वेगेट, उत्तरासाठी वेळनागपूर : मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाला २८ ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी विशेष समिती गठित केली आहे. समितीत विभागीय आयुक्त, नासुप्रचे सभापती, महानगरपालिका आयुक्त आदींचा समावेश आहे.आरटीई उल्लंघन, उत्तराची प्रतीक्षानागपूर : शहरातील अनेक शाळांनी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. यासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कायद्याचे काटेकोर पालन न करणाऱ्या शंभरावर शाळांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. या शाळांनी अद्याप उत्तर सादर केलेले नाही. यामुळे बुधवारी सुनावणी तहकूब करण्यात आली.