सारांश---पुनर्मूल्यांकनाची मोहीम थंडावली
By admin | Published: October 03, 2015 12:20 AM
अकोला: मालमत्ता मोजणीसाठी मनपा प्रशासनाने सुरू केलेली पुनर्मूल्यांकन मोहीम तूर्तास थंडावल्याचे चित्र आहे. पूर्व-उत्तर व दक्षिण झोनमधील मोजणी आटोपल्यानंतर प्रशासनाने पश्चिम झोनमध्ये मोहीम सुरू केली. परंतु कामकाज सुस्तावल्याचे दिसत आहे.
अकोला: मालमत्ता मोजणीसाठी मनपा प्रशासनाने सुरू केलेली पुनर्मूल्यांकन मोहीम तूर्तास थंडावल्याचे चित्र आहे. पूर्व-उत्तर व दक्षिण झोनमधील मोजणी आटोपल्यानंतर प्रशासनाने पश्चिम झोनमध्ये मोहीम सुरू केली. परंतु कामकाज सुस्तावल्याचे दिसत आहे.**********************************************************************मनपात गांधी जयंतीअकोला: महापालिकेच्या मुख्य सभागृहात शुक्रवारी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख, विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. यावेळी मनपा कर्मचारी उपस्थित होते. **********************************************************************शाळा क्र.९मध्ये गणवेश वाटपअकोला: खदान परिसरातील हाजी मो.जाफर सिद्दीकी मनपा उर्दू शाळा क्र. ९ मध्ये माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. शाळा मुख्याध्यापक मजहर अलहसन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. **********************************************************************शिक्षकांच्या सेवेत पतसंस्थाअकोला: मनपा शिक्षकांसाठी शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. कार्यक्रमाला आमदार गोवर्धन शर्मा, महापौर उज्ज्वला देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पतसंस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.**********************************************************************व्हॉल्व दुरुस्त कराअकोला : जुने शहरातील कस्तुरबा गांधी रुग्णालयानजीक मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व निकामी झाल्यामुळे पाण्याचा प्रचंड अपव्यय झाल्याचे चित्र शुक्रवारी समोर आले. पाण्याची टंचाई असल्यामुळे प्रशासनाने तत्काळ व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी होत आहे.********************************************************************************दूषित पाणीपुरवठा अकोला: शहराच्या पश्चिम झोनमध्ये दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दूषित पाण्यामुळे विविध आजारांची साथ पसरण्याचा धोका असून, या प्रकरणाची जलप्रदाय विभागाने दखल घेण्याची मागणी होत आहे.******************************************************************************** सुविधांची पूर्तता करा अकोला: महापालिकेच्या किसनबाई भरतिया रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गोरगरीब रुग्णांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. पिण्याचे पाणी, शौचालय, मुत्रीघर आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली.