ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ७ - गोव्यातील फॅब इंडियाच्या शोरूममधील चेंजिग रूममध्ये छुपा कॅमेरा आढळल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी मंगळवारी फॅब इंडियाचे सीईओ, एमडी आणि अन्य नऊ जणांना समन्स बजावला असून त्या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे.
शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेरा आणि डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर तपासणीसाठी हैदराबादमधील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी येथे पाठवण्यात आले आहे.
गोवा भाजपाच्या प्रभारी व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी गोव्यातील कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रूमवर लावलेला ‘छुपा कॅमेरा’ पकडल्याने मोठी खळबळ उडाली होती. खासगी कारणास्तव गोवा भेटीवर आलेल्या स्मृती इराणी ‘फॅब इंडिया’च्या शोरूममध्ये गेल्या असता तेथे त्यांना चेंजिंग रूमवर छुपा कॅमेरा बसविल्याचे आढळून आले. त्यांनी आमदार लोबो यांना माहिती दिली. लोबो यांनी ‘फॅब इंडिया’ शोरूमविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद केला.