नवी दिल्ली : ‘आसमान में सिर उठाकर, घने बादलों को चीर कर, रोशनी का संकल्प लें, अभी तो सूरज उगा है,’ असे स्वरचित कवितेतून जनतेला आवाहन करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्षाचे अनोखे स्वागत केले आहे. कोरोनाच्या साथीमुळे काळवंडलेले २०२० हे वर्ष संपले; पण नवीन वर्षावरही या साथीचे सावट आहेच. अशा वातावरणात करोडो देशवासीयांच्या मनाला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कविता केली आहे.
मायगव्हर्मेंट इंडिया या ट्विटर हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘अभी तो सूरज उगा है’ या शीर्षकाची कविता झळकविण्यात आली. १ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी कवितेचे वाचन करून नववर्षाचे स्वागत करू, या असेही या ट्विटर हँडलवर म्हटले आहे. कोरोनाशी लढणारे डॉक्टर, लष्करी सैनिक व पोलीस यांना ही कविता समर्पित केली.
आसमान में सिर उठाकर घने बादलों को चीर कर रोशनी का संकल्प लें अभी तो सूरज उगा है।दृढ़ निश्चय के साथ चलकर हर मुश्कील को पार कर घोर अंधेरे को मिटाने अभी तो सूरज उगा है।विश्वास की लौ जलाकर विकास का दीपक लेकर सपनों को साकार करनेअभी तो सूरज उगा है।न अपना न परायान तेरा न मेरा सबका तेज बनकर अभी तो सूरज उगा है।आग को समेटते प्रकाश को बिखेरता चलता और चलाता अभी तो सूरज उगा है।विकृति ने प्रकृति को दबोचा अपनों से ध्वस्त होती आज है कल बचाने और बनाने अभी तो सूरज उगा है।
कवि - पंतप्रधान नरेंद्र मोदी