शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

सूर्य कोपला, पारा ४३ अंशांवर; आठ राज्यांमध्ये उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 05:58 IST

आठ राज्यांमध्ये उष्णतेची लाट, अनेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीचा फिव्हर चढला असताना तापमानाचा पाराही हळूहळू वर सरकत  आहे. काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्याचबरोबर जवळपास ८ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

देशातील १४ राज्यांमध्ये काही ठिकाणी रविवारी आणि सोमवारीही पावसाने हजेरी लावली. उष्णतेची लाट येणाऱ्या राज्यांत कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी यांचा समावेश होतो. या राज्यांमध्ये सध्या तापमान ४३ अंशांवर पोहोचले आहे. रविवारी आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली. केरळ, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये ९ ते १२ एप्रिलदरम्यान पाऊस पडू शकतो.

मध्य प्रदेश, झारखंडमध्ये पाऊस अन् वारा मध्य प्रदेशात गारपीट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली. रविवारी संध्याकाळी भोपाळला पावसाने तडाखा दिला. सिवनी, मालाजखंड, गुना, अशोकनगर, सिहोर, शाजापूर, बैतूल, नर्मदापुरम, सागर, राजगड, बालाघाट, दिंडोरी, विदिशा, रायसेन, धार, देवास, इंदूर, पंढूर आणि मांडला येथे रिमझिम पाऊस झाला. झारखंडमध्ये रविवारी रात्री उशिरा रांचीच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला.

छत्तीसगडमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारीयेत्या आठवड्यात दोन पश्चिमी हवामान बदल अपेक्षित आहेत. पहिला हवामान बदल १० एप्रिल आणि दुसरा १३ एप्रिलला सक्रिय होईल. त्यामुळे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशात १० ते १३ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे, १३ एप्रिल रोजी पंजाब आणि चंडीगडमध्ये पाऊस पडू शकतो. छत्तीसगडमध्ये ९ ते ११ एप्रिलपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायपूर, बिलासपूर, दुर्ग, बस्तर आणि सुरगुजा विभागात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी पहाटे रायपूर आणि गरिआबंदसह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह सरी कोसळल्या.बिहारमध्येही तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, मंगळवारी पाटणासह १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहतील.

 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलSun strokeउष्माघात