नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एसआयटीने नव्याने सखोल तपास सुरू केला असून, साक्षीदारांची पुन्हा चौकशी केली जात असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त भीमसेन बस्सी यांनी सोमवारी सांगितले.अलीकडेच अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) ताजा अहवाल सादर केल्यानंतर त्या अनुषंगाने सखोल तपास केला जात आहे, असे बस्सी यांनी टिष्ट्वटरवर माहिती देताना नमूद केले. सुनंदा यांचे पती काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा घरगुती नोकर नारायणसिंग, चालक बजरंगी यांचीही तपास पथकाने चौकशी केली आहे. बस्सी हे याच महिन्यात सेवानिवृत्त होत असून त्याआधी या प्रकरणाचा नव्याने तपास करीत आरोपपत्र दाखल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सुनंदा यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. १७ जानेवारी २०१४ रोजी सुनंदा यांचा मृतदेह दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यांनी आत्महत्या केली, की त्यांची हत्या झाली, हा गुंता सोडविण्यासाठी तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाचा पुन्हा करणार तपास
By admin | Published: February 02, 2016 2:32 AM