शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

सुनंदा पुष्कर यांचा खूनच

By admin | Published: January 07, 2015 2:40 AM

माजी केंद्रीय मंत्री आणि काँगे्रस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हत्येचा गुन्हा : विषप्रयोग झाल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँगे्रस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय बोर्डाच्या अंतिम अहवालाच्या आधारावर खुद्द दिल्ली पोलीस आयुक्त भीमसेन बस्सी यांनीच दिलेल्या या खळबळजनक माहितीमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे़ याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हाही दाखल केला असला, तरी संशयित म्हणून अद्याप कुणाचेही नाव समोर आलेले नाही़ या नव्या कलाटणीनंतर थरूर यांची नव्याने चौकशी होण्याची चिन्हे आहेत.सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला होता, असा अंतिम वैद्यकीय अहवाल वैद्यकीय बोर्डाने सोपवला असल्याचे बस्सी यांनी मंगळवारी पत्र परिषदेत सांगितले़ अर्थात त्यांनी स्वत: विष घेतले की त्यांना कुणी बळजबरीने विष दिले, हे अद्याप सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ हत्येच्या तपासासाठी विशेष टीमसुनंदा यांच्या हत्येच्या तपासासाठी एक विशेष पथक गठित करण्यात आले आहे़ सुनंदा यांचे नमुने तपासणीसाठी विदेशात पाठवले जातील, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली़ सुनंदा यांचा मृत्यू औषधांच्या ज्यादा मात्रेने झाल्याचे व्हिसेरा अहवालात म्हटले होते़ आता त्यांचा मृत्यू विषाने झाला, जे तोंडावाटे वा इंजेक्शनद्वारे दिले गेलेले असावे, असा तर्क आहे.थरूरांच्या अडचणी वाढणारहत्येचा गुन्हा दाखल केला, हे ऐकून मी सुन्न झालो असल्याचे शशी थरूर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, हीच माझी इच्छा आहे आणि पोलिसांना माझे पूर्ण सहकार्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र ताज्या वैद्यकीय अहवालानंतर शशी थरूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे़ १७ जानेवारी २०१४ रोजी चाणक्यपुरीस्थित लीला पॅलेस या पंचतारांकित हॉटेलच्या खोली क्रमांक ३४५ मध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळला होता़ यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते़