ऑनलाइन लोकमत
गाझीपूर, दि. ३ - अभिनेत्री सनी लिओनच्या कंडोमच्या बीभत्स जाहिरातींमुळेच देशात बलात्काराचे गुन्हे वाढतीलच असे अजब तर्कट मार्क्सवादी पक्षाचे नेते अतुलकुमार अंजान यांनी मांडले आहे. अशा जाहिरातींमुळे लैंगिकतेला उत्तेजना मिळते व जबाबदारीची भावना संपुष्टात येते असेही त्यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेशमधील गाझीपूर येथे झालेल्या सभेत मार्क्सवादी पक्षाचे नेते अतुलकुमार अंजान यांनी भाषण केले. मात्र भाषणात अंजान थेट सनी लिअोनवर घसरले व भलताच वाद ओढावून घेतला. सनी लिओनसारखी पॉर्नस्टार आता भारतात अभिनेत्री म्हणून आली आहे. सध्या टीव्ही तिची कंडोमची जाहिरात दाखवली जात असून या अश्लील जाहिरातींमुळे लैंगिकतेला उत्तेजना मिळते असा दावाही त्यांनी केला. अशा जाहिराती दाखवल्यातर बलात्काराच्या घटना वाढतील असे वादग्रस्त विधानही त्यांनी या सभेत केले आहे.