चंद्रयान नुकतेच चंद्राच्या भूपृष्ठावर पोहोचलेले आहे, जगाला या मोहिमेतून काय माहिती मिळते याची उत्सुकता आहे. असे असताना उद्या, ३० ऑगस्टला मोठी खगोलीय घटना घडणार आहे. बुधवारी ब्लू सुपरमून दिसणार आहे.
यंदाच्या वर्षात चंद्र तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या आकारात दिसणार आहे. ३० ऑगस्टला चंद्राचा आकार नेहमीपेक्षा ७ टक्के मोठा आणि १६ टक्के अधिक चमकणारा असणार आहे. असे दृश्य काही वर्षे पुन्हा दिसणार नाही. ब्लू सुपरमून दर 2 किंवा 3 वर्षांनीच दिसतो. आता अशी घटना 2026 मध्ये पाहायला मिळेल. 2018 मध्ये ब्लू सुपरमून दरम्यान चंद्र पृथ्वीपासून 3,57,530 किमी अंतरावर होता, तर 30 ऑगस्ट रोजी चंद्र आणखी 3,57,344 किमी अंतरावर असेल.
अंतराळात घडणाऱ्या खगोलशास्त्रीय घटनांमुळे अमावस्या, पूर्ण चंद्र, सुपर मून आणि ब्लू मून दिसत असतात. जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसरी पौर्णिमा ब्लू मून मानली जाते. चंद्र सामान्य दिवसांपेक्षा अधिक उजळलेला दिसतो. हे तेव्हाच दिसते जेव्हा चंद्र पृथ्वीपासून खूप जवळ आलेला असतो, असे नासाने म्हटले आहे.
30 ऑगस्ट 2023 रोजी रात्री ठीक 8.37 वाजता सुपर ब्लू मून अधिक उजळ आणि मोठा दिसेल. परंतू, ही वेळ भारतात दिवसाची असेल. म्हणजेच अमेरिकेत रात्रीच्यावेळी हा ब्ल्यू मून दिसणार आहे. यामुळे भारतीयांना मोबाईलवरूनच ब्ल्यू मुन पहावा लागणार आहे.