शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

जातीय समिकरणांचा आधार सर्व पक्षात धर्मनिरपक्षतेचा प्रचार : बेरजेच्या राजकारणावर उमेदवारांचा भर

By admin | Published: February 15, 2017 9:06 PM

जातीय समिकरणांचा आधार सर्व पक्षात धर्मनिरपक्षतेचा प्रचार : बेरजेच्या राजकारणावर उमेदवारांचा भर

अमरावती : जिल्ह्यात ५९ गट व ८८ गणांच्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामध्ये अलीकडेच जाती, धर्माचे वातावरण प्रभावी ठरत आहे. धर्मनिरपेक्ष म्हणून डांगोऱ्या पिटणाऱ्या उमेदवारांकडून जातीय समिकरणांचा आधार घेतल्या जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. बेरजेचे राजकारण करताना नवनवीन क्लुप्त्या राजकीय पक्ष व उमेदवारांद्वारा आखल्या जातात. कुठल्या गावात, कुठल्या भागात जातीय समिकरणांचा प्रभाव आहे, याचा आढावा घेऊन समिकरणे आखल्या जात आहेत. ‘हिंदुत्ववादी व्होट बँक’ काबीज करण्याचा प्रयत्न भाजप व शिवसेनेद्वारा केल्या जात आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्ष व संघटना बहुजन समाज, दलित-मुस्लिम, आदिवासी आदी समाजाची गठ्ठा मते कशी मिळविता येतील, याचे नियोजन करीत आहे. यामध्ये आता ‘मराठा समाजाला’ आरक्षण या नवीन मुद्द्याची भर पडली आहे. यासाठी सर्वच पक्षाद्वारा विशेष बैठका होत आहेत. आपल्या पक्षाच्या व्होट बँकेला कुठेही खिंडार पडू नये, याची देखील दक्षता घेतली जात आहे. महायुती व आघाडी यांच्यात ताटातूट झाल्यानंतर मतांमध्ये विभागणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना मताधिक्य मात्र कमी राहणार आहे. पक्षीय मतदारांसोबतच जात, धर्माच्या नावावर डाव खेळून ‘सेफ झोन’ मध्ये राहण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार करीत आहे. समाजातील नेत्यांना पुढे करून अधिकाधिक मते खेचण्याकडे उमेदवारांचा कल दिसून येतो. आशीर्वादासाठी सर्व काहीअलिकडच्या निवडणुकांमध्ये धार्मिक संस्थाचा वावर वाढला आहे. त्या धर्माच्या संत, महंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी उमेदवारांचा आटापीटा सुरू आहे. धार्मिक संस्थांना भेटी देणे, संवाद साधने यावर भर दिल्या जात आहे. प्रसंगी पक्षाच्या मोठ्या नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रकार देखील होताना दिसत आहे.

जातीय संघटनेच्या पुढाऱ्यांना कमालीचे महत्वसर्व जाती, धर्माची मते मिळावीत, याकडे उमेदवारांचा कल दिसून येतो. यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणेच या निवडणुकीत जातीय संघटनेच्या पुढाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. यामध्ये काहींनी खुलेआम तर काहींनी सावध भूमिका घेतली आहे.