- एस. के. गुप्तानवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्षाच्या सगळ्या शाखा भाग घेतील. उच्चपदस्थ सूत्रांनुसार पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सगळ्या प्रदेश शाखांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या आशयाचे आदेश दिले गेले आहेत. प्रदेश काँग्रेसला सांगण्यात आले आहे की, जिल्हा स्तरावर त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून निदर्शने करावीत. राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले की, ‘८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून शांततेत भारत बंद आहे. आम्ही याला पूर्ण पाठिंबा देत आहाेत. अडानी-अंबानी कृषी कायदा परत घ्या.’ दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे. पक्षाचे शेतकरी नेते सुनील जाखड यांनी आंदोलनाचे स्वरूप सांगताना म्हटले की, हा फक्त शेतकऱ्यांसाठीचा कायदा नाही तर लोकांचे आंदोलन बनले आहे. मोदी सरकार औद्योगिक घराण्यांसाठी लॉबिंगचे काम करत आहे.
अखिलेश यादव यांना किसान यात्रेपूर्वी घेतले ताब्यात लखनौ : कृषी कायद्याला विरोध करीत निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सपाकडून सोमवारी पूर्ण उत्तर प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या किसान यात्रेपूर्वी पक्ष मुख्यालयाचा भाग पोलिसांनी सील केला. त्याविरोधात धरणे देण्यास बसलेले सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्यात आले.अखिलेश यांना सोमवारी कन्नौजमध्ये किसान यात्रेत सहभागी व्हायचे होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचे घर आणि पक्ष मुख्यालयाचा भाग सील केला. अखिलेश हे कन्नौजला जाण्यासाठी आपल्या घरातून निघाले तेव्हा पोलिसांनी त्यांचे वाहन रोखले. त्यामुळे अखिलेश हे धरणे देण्यासाठी बसले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसविण्यात आले. यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, भाजपची ही हुकूमशाही आहे. भाजपसाठी कोरोना नाही. केवळ विरोधकांसाठी आहे. भाजप देशात कधीही सभा, प्रचार करो त्यांच्यासाठी कोरोना नाही.
आंदोलनस्थळी ग्रंथालयनवी दिल्ली : गाजीपूरमध्ये आंदोलनस्थळी काही तरुणांनी एक अस्थायी ग्रंथालय उभारले आहे. शेतकऱ्यांपासून ते भगतसिंग आदी अनेक विषयांवरील पुस्तके इथे आहेत. कृषी विधेयकावरील एक पुस्तक इथे केवळ ५ रुपयांत उपलब्ध असून, या पुस्तकाची खूप विक्री झाली आहे.