ओबामांची ग्वाही : द्विपक्षीय संबंधातील नवा अध्याय; दोनदा भारतवारी ही अभिमानाची बाबनवी दिल्ली : भारत आणि अमेरिका हे किती नैसर्गिक व सहकारी आहेत, हे जगाला दाखवून देण्यासाठी आपला दौरा ही एक मोठी संधी असल्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. दौऱ्यावर येण्यापूर्वी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ओबामांनी भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व देण्याच्या मागणीलाही पाठिंबा दिला.ओबामा म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक आणि त्यांची बांधीलकी हा द्विपक्षीय संबंधांतील एक नवा अध्याय आहे. यास आगामी काळात चालना देणे आवश्यक आहे. भारत-अमेरिका हे जागतिक सहकारी असल्याचे मी मागच्या दौऱ्यात भारतीय संसदेला संबोधित करताना नमूद केले होते. आता हा दृष्टीकोन वास्तवात येण्याचे गरज आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष हा मान मिळविण्यासाठीच हे निमंत्रण मी स्वीकारले आहे.’ नोव्हेंबर २०१० मध्ये ओबामा यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशानाला संबोधित केले होते. भारतीय संविधानाच्या पासष्टीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान मोदी आणि भारतीय नागरिकांंना भेटण्यास आपण आतुर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय दौऱ्याचे विश्लेषण करताना ओबामा यांनी ‘ठोस प्रगतीसाठी मोदी यांच्यासोबत काम करण्याची ही एक संधी आहे. उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासातील हा एक नवा अध्याय असेल.’ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत आपले घनिष्ट संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष म्हणून दोनवेळा भारत दौऱ्यावर येण्याचा मान मिळणार आहे, याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही ओबामा म्हणाले. वॉंिशंग्टन : बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात प्रादेशिक व्यापाराच्या मुद्याला खूप महत्त्व राहणार आहे. कारण, या पातळीवर व्यापार संबंधांच्या विस्तारासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. अमेरिकी परराष्ट्र विभागाच्या सहायक सचिव (दक्षिण-मध्य अशिया) निशा देसाई बिस्वाल यांनी यास दुजोरा दिला.बिस्वाल म्हणाल्या, भारत व अफगाणिस्तान नव्याने आलेल्या सरकारकडून प्रादेशिक सह-अस्तित्व व वृद्धी यांनी पुनर्परिभाषित केले जात आहे. मोदीही दीर्घकाळापासून प्रलंबित आर्थिक व गुंतवणूक सुधारणा राबविण्याची ग्वाही दिली आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्था व मध्य आशियासह आपल्या शेजारी बाजारपेठांच्या वृद्धीसही प्राधान्य दिले.
राजघाट, विजयपथ आणि ताजही...अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताक दिनाला येणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष असून, २५ जानेवारी रोजी सकाळी ओबामा दाम्पत्याचे एअरफोर्स वन बोर्इंग ७४७-२०० हे विमान बी पालम विमानतळावर उतरताच भारत व अमेरिकेचे सुरक्षा कमांडो त्यांच्याभोवती सुरक्षेचे अभेद्य कवच उभारतील. विमानतळ लष्कराच्या अखत्यारीत असून पंतप्रधान व राष्ट्रपतींसारख्या महत्वाच्या व्यक्तींच्या उड्डाणांसाठी याच विमानतळाचा वापर केला जातो. पालम विमान तळावरुन ते थेट मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये जातील. या हॉटेलच्या १४ व्या मजल्यावर ओबामा यांच्यासाठी खास स्वीट तयार करण्यात आले असून ४३८ खोल्या असणाऱ्या या पंचतारांकित हॉटेलमधील ४०० खोल्या अमेरिकी सरकारने बुक केल्या आहेत. मदतीस तयारभारत व अमेरिकेतील संबंध मजबूत करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याबद्दलही ओबामांनी या मुलाखतीत आपली भूमिका विशद केली. अमेरिकी कंपन्या भारतात पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीस तयार आहेत. यामुळे भारताच्या अर्थगतीस चालना मिळेल. आम्ही स्वच्छ हवा, पिण्याचे पाणी आणि वाढती वीज गरज भागविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नास मदत करण्यास तयार असल्याचे ओबामा यांनी सांगितले.