२३४ शेतकरी कुटुंबांना शिवसेना देणार मदतीचा हात उद्धव ठाकरेंच्या हस्ते मदत: प्रत्येकी १० हजार देणार
By admin | Published: December 19, 2015 12:19 AM
जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २० रोजी जळगाव, धुळे, नंदुबार जिल्ातील आत्महत्या केलेल्या २५० शेतकर्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजाराची मदत देणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी शिवसेनेच्या आमदारांच्या जिल्ातील दौर्याचे नियोजन संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत पूर्ण झाले.
जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २० रोजी जळगाव, धुळे, नंदुबार जिल्ातील आत्महत्या केलेल्या २५० शेतकर्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजाराची मदत देणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी शिवसेनेच्या आमदारांच्या जिल्ातील दौर्याचे नियोजन संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत पूर्ण झाले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २० रोजी जळगावी येत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव,धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ात सरकारतर्फे जाहीर झालेल्या योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळतो का?, कोणत्या सरकारी योजना कार्यान्वित आहेत, त्याचा लाभ मिळालेल्या लाभार्थींची संख्या यासह विविध मुद्यांची माहिती उद्धव ठाकरे हे पक्षाच्या आमदाराकडून घेणार आहेत. ६० आमदार खान्देशातशिवसेनेचे मंत्री आमदार असे ६० लोकप्रतिनिधी १९ रोजी खान्देशात असतील. जळगाव येथे २०, नाशिक १८, नंदूरबार ९ व धुळे येथे १३ आमदार असतील. ठरवून दिलेल्या तालुक्यांना हे आमदार भेट देऊन आपला तेथील विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतील. जळगाव जिल्ाचे नियोजनजळगाव ग्रामीण, धरणगाव आमदार सुभाष साबणे, मुक्ताईनगर-बोदवड आमदार दीपक केसकर व उपनेत्या आमदार डॉ. निलम गोर्हे, भुसावळ- आमदार सुनील शिंदे, रावेर, यावल- आमदार राहुल पाटील, चोपडा- आमदार हेमंत पाटील, पाचोरा-भडगाव- आमदार अर्जुन खोतकर, चाळीसगाव- आमदार संजय शिरसाठ, पारोळा-एरंडोल- आमदार अशोक पाटील, अमळनेर - आमदार उल्हास पाटील, जामनेर - आमदार डॉ. संजय रायमुलकर हे भेटी देऊन तेथील परिस्थितीचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना २० रोजी सादर करतील. -----असे असतील कार्यक्रमसकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे हे जळगावात दाखल होतील. दुपारी १२ वाजेपर्यंत अजिंठा विश्रामगृहात त्यांना पक्षाचे आमदार भेटी दिलेल्या तालुक्यांचा अहवाल सादर करतील. यानंतर दुपारी १२.३० वाजेनंतर उद्धव ठाकरे हे सागरपार्क मैदानकडे रवाना होतील. तेथे खान्देशातील आत्महत्या केलेल्या जळगाव जिल्ातील १७५, धुळे जिल्ातील ५६ व नंदुरबार जिल्ातील ३ शेतकर्यांच्या कुटुंबीयांना १० हजाराच्या आर्थिक मदतीचे वाटप करतील. यानंतर ते याच मैदानावरील सभेस मार्गदर्शन करणार आहेत. जय्यत तयारी सुरूउद्धव ठाकरे यांचा दौरा व आमदारांच्या दौर्याचे नियोजन शिवसेनेच्या पदाधिकार्यांकडून सुरू झाले आहे. सभेची सागर पार्कवर जय्यत तयारी सुरू आहे. संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी या तयारीचा प्रमुख पदाधिकार्यांकडून आढावा घेऊन मार्गदर्शन केले.