नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या याच्या निधनानंतर आता मानसिक आजाराविषयीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, यावरून सुप्रीम कोर्टानेही मानसिकरीत्या आजारी असलेल्या रूग्णांना विमा का दिला जात नाही, असा सवाल केंद्र सरकार आणि विमा कंपन्यांवर लक्ष ठेवणाऱ्या आयआरडीए संस्थेला विचारला आहे.
एका जनहित याचिकेत म्हटले आहे की, 2017 आणि 2018 मध्ये कायद्यात सुधारणा करून मानसिक आजाराला विमा कॅटेगरीमध्ये आणले होते. तरीही विमा कंपन्या त्याचे पालन करीत नाहीत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात केंद्र सरकारकडे येत्या चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गेल्या रविवारी (14 जून) आपले जीवन संपवले. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूतने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. मात्र, यावर अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
या प्रकरणातील आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, सुशांत सिंह राजपूत हा बराच काळ मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे सुशांत सिंग राजपूतच्या मानसिक तणावाचे कारण काय होते, ज्यामुळे त्याला आत्महत्या करायला भाग पाडले, अशी चर्चा आता बॉलिवूडमध्ये रंगली आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही आता केंद्र सरकारला नोटीस बजावून मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तींचा विमा का काढला नाही, असा सवाल करत यासंदर्भात उत्तर मागितले आहे.
आणखी बातम्या....
पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार
"अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
"हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे", आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल