नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगणी करण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर व धक्कादायक आरोप केले आहे. या प्रकरणी राज्यासह देशभरात याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. यातच आता परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे. (supreme court to be hear param bir singh plea against anil deshmukh on wednesday)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप केला आहे. या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआय चौकशी करा, अशी मागणी केली आहे. या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शासनाने केलेल्या बदलीच्या आदेशाला आव्हान
न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर परमबीर सिंग यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंग यांची मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. शासनाच्या या आदेशाला परमबीर सिंग यांनी या याचिकेत आव्हान दिले आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून केलेली बदली बेकायदेशीर असल्याने रद्द करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा
पुरावे नष्ट होण्यापूर्वी सतत्या तपासणे आवश्यक
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारीची निःपक्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी या प्रकरणी सतत्या तपासणे आवश्यक आहे. पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.