आज सुप्रीम कोर्टात इलेक्टोरल बाँड्स प्रकरणी सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या घटनापीठाने इलेक्टोरल बाँडच्या युनिक नंबरच्या खुलासाबाबत सुनावणी करताना स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारले. CJI डीवाय चंद्रचूड म्हणाले की, एसबीआयला प्रत्येक आवश्यक माहिती द्यावी लागेल. यावर एसबीआयने बदनामी होत असल्याचे म्हटले आहे.
इलेक्टोरल बाँड: एसबीआयने लपविले, चंद्रचूड यांनी नेमके तेच पकडले; नंबरही जारी करण्याचे दिले आदेश
निवडणूक रोख्यांबाबत सुप्रीम कोर्टात मागील आठवड्यात सुनावणी झाली तेव्हा, बॉण्डचा क्रमांक जाहीर न केल्याबद्दल न्यायालयाने एसबीआयला प्रश्न विचारला होता. एसबीआयने युनिक नंबर उघड करावा, कारण ते तसे करण्यास बांधील आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. युनिक नंबरद्वारे, देणगी कोणत्या राजकीय पक्षाला दिली होती आणि देणगी देणारी व्यक्ती/कंपनी कोण होती हे कळू शकते.
कोर्टाने काय सांगितले?
आज सुप्रीम कोर्टात इलेक्टोरल बाँड्सबाबत सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, CJI चंद्रचुड म्हणाले, आम्ही संपूर्ण तपशील देण्यास सांगितले आहे. पण SBI ने निवडक माहिती दिली आहे. ती हे करू शकत नाही. त्यावर वकील साळवे म्हणाले की, आम्ही सर्व माहिती देण्यास तयार आहोत.
एसबीआयने काय सांगितले?
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या आदेशाची वाट पाहू शकत नाही, आम्ही न्यायालय जे म्हणेल ते करू. तुम्हाला ऑर्डर समजायला हवी होती. यावर वकील हरीश साळवे म्हणाले की, एसबीआयबाबत चुकीची प्रतिमा निर्माण केली जात आहे. आदेशात काय लिहिले होते ते आम्हाला स्पष्ट करायचे आहे. आम्हाला समजले की आम्हाला बाँडची तारीख, बाँड खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव, रक्कम आणि रोख रक्कम मिळविणाऱ्या व्यक्तीचे तपशील देण्यास सांगितले आहे.
राजकीय पक्षांना किती देणगी दिली हे निवडणूक आयोगाला सांगायचे असल्याने आणि ही माहितीही सीलबंद पाकिटात न्यायालयाला देण्यात आल्याचे साळवे यांनी सुनावणीदरम्यान सांगितले. त्यामुळे ही माहिती बाहेर यायला हवी होती. बाँड क्रमांक द्यावा लागला तर नक्कीच देऊ, यात आम्हाला कोणतीही अडचण नाही, असंही एसबीआयच्या वकीलांनी सांगितले.