नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एका वकिलाला न्यायालयाचा अवमान केल्याने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये एक वर्ष काम करण्यावर बंदी आणली आहे. या वकिलावर न्यायालयाने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, मात्र त्याने माफी मागितल्याने ती रद्द करण्यात आली आणि काम करण्यावर बंदी आणली.
वकील मॅथ्यू नेपुंदरा असे त्याचे नाव असून त्याने न्यायाधिशांना धमकावल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालय किंवा देशातील कोणत्याही न्यायालयांना त्याच्या आदेशांचा अवमान केल्यास शिक्षा सुनावण्याचा अधिकार आहे. अवमान दोन प्रकारचा असतो. एक नागरी अवमान आणि दुसरा गुन्हेगारी अवमान. नेपुंदरा याने न्यायाधिशांना धमकावत गुन्हेगारी स्वरुपाचा अवमान केला होता.