शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सुप्रीम कोर्टाचे निर्देश सर्रास धाब्यावर : पोलीस कारवाईचा बार फुसका; राज्यात केवळ ३०० गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 7:37 AM

सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश धाब्यावर बसवत दिवाळीत सर्वत्र फटक्यांचा धूमधडाका उडाल्याने पोलीस कारवाईचा बार फुसकाच ठरला.

दिल्ली/मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश धाब्यावर बसवत दिवाळीत सर्वत्र फटक्यांचा धूमधडाका उडाल्याने पोलीस कारवाईचा बार फुसकाच ठरला. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेशिवाय फटाके फोडल्याबद्दल राज्यात केवळ ३०० जणांवर गुन्हे दाखल झाले असून मुंबईत आठ जणांना अटक झाली आहे.दिवाळीत रात्री आठ ते दहा या कालावधीतच फटाके फोडण्याचे बंधन न्यायालयाने घातले होते. मात्र या आदेशाचे देशातील अनेक भागांत सर्रास उल्लंघन झाले. तरीदेखील फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने हा आदेश म्हणजे चांगली सुरुवात आहे, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.सोलापूर पोलीस आयुक्तांनी पहाटे आणि रात्री १० वाजेनंतर फटाके उडविणाºयांवर कारवाईचे निर्देश देताच ठाणेदारांनी १३६ जणांविरुद्ध भा.दं.वि. कलम १८८, १९० आणि १९१ नुसार गुन्हे दाखल केले. नागपुरात ६४ फटाकेबाजांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर मुंबई-ठाण्यात पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून शंभराहून अधिकव्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला. तसेच बेकायदा फटाके विक्रेत्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापुरात विनापरवाना फटाके विक्री केल्याबद्दल १३ विक्रेत्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.मात्र फटाके वाजवल्याबद्दल कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात एकही गुन्हा नोंद झालेला नाही. अकोला पोलिसांनी मात्र एकही गुन्हा दाखल न करता वरिष्ठ स्तरावरून परिपत्रक न आल्याचे सांगून कारवाईस टाळाटाळ केली.पुणे पोलिसांच्या नियत्रंणकक्षाकडे व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर ३५तक्रारी आल्या आहेत. मात्र एकावरही कारवाई झाली नाही. येरवड्यातफटाके वाजविणाºयांनी पोलिसांनाच मारहाण केली.उत्पादनावरही होणार परिणामफटाक्यांमुळे होणाºया प्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा देणारे अ‍ॅड. गोपाल शंकरनारायणन म्हणाले, न्यायालयाचा आदेश दिल्लीत नीट पाळण्यात आला नाही याला या शहरातील पोलीस यंत्रणाच जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे भविष्यात फटाक्यांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे. पुढच्या वर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे होणाºया प्रदूषणात नक्कीच घट झालेली असेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :fire crackerफटाकेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय