नवी दिल्ली : चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. लालू प्रसाद यादव यांनी प्रकृतीचे कारण देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी त्यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव 1977 सालानंतर पहिल्यांदाच आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहणार आहेत.
मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी लालू प्रसाद यादव हे गेल्या 8 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी विशेष सुविधा दिली जात आहे. तसेच, त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला. यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे लालू प्रसाद यादव 1977 सालानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकणार नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांनी आपल्या पार्टीसाठी प्रचार केला होता.
'जीवन में लालू हैं, कण-कण में लालू हैं,' विरहाने व्याकूळ राबडीदेवींनी रचली कविता बिहारच्या राजकारणाचे केंद्र मानले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव सध्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे गेल्या चार दशकांनंतर प्रथमच बिहारमधील निवडणुकीच्या प्रचारामध्ये लालूप्रसाद यादव यांचा सहभाग दिसणार नाही. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या त्यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी आपल्या मनातील व्यथा कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे.
तेजप्रताप-तेजस्वी वादामुळे लालूप्रसादांच्या घरात यादवी; लालू-राबडी मोर्चाची स्थापना लालुप्रसाद यादव यांच्या तेजस्वी व तेजप्रताप या दोन मुलांचे आपसात अजिबात पटत नाही, हे आता उघडचे झाले आहे. आपले बंधू तेजस्वी यांच्या आसपास चापलुसांची संख्याच मोठी आहे, ते सारे बॅक्टेरिया आहेत. असे सांगून पक्षाच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उतरवण्याचे तेजप्रताप यांनी जाहीर केले आहे. तेजप्रताप हे लालुप्रसादांचे मोठे पुत्र आहेत. पण पक्षाची सारी सुत्रे तेजस्वी यादव यांच्याकडे आहेत. कदाचित त्याचा रागही तेजप्रताप यांना असावा, असे समजते. तेजप्रताप म्हणाले की, दात खराब झाले की, डॉक्टर इंजेक्शन देतात, बॅक्टेरिया काढून टाकतात. तसेच पक्षात निर्माण झालेले चापलूस, बॅक्टेरिया यांना संपवण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. तेजप्रताप यांनी लालू-राबडी मोर्चा नावाची संघटनाच स्थापन केली आहे.