नवी दिल्ली : माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या पाचही जणांना त्यांच्या घरातच १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पुणे पोलिसांना दिले. त्यांचा ताबा मिळावा, ही पुणे पोलिसांची विनंती न्यायालयाने अमान्य करताना, पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठाने वरवरा राव, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्सालविस व गौतम नवलखा यांच्या नजरकैदेची मुदत वाढवतानाच, न्यायालसमोर असलेल्या प्रकरणांबद्दल अधिकाºयांनी अधिक जबाबदारीने वागावे, असेही पोलिसांना सुनावले. हे प्रकरण आमच्यासमोर आहे. त्यामुळे तुमच्या अधिकाºयांना जबाबदारीने वागायला सांगा, सर्वोच्च न्यायालयाची चूक झाली आहे, असे या अधिकाºयांकडून ऐकावे लागू नये, असे खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अॅड. तुषार मेहता यांना सांगितले.अर्जदारांना सूचना- फौजदारी गुन्ह्यांच्याप्रकरणात आरोपींखेरीज अन्य कोणीही व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते, या तुमच्या दाव्याला सुसंगत असा पुरावा सादर करा, असे खंडपीठाने रोमिला थापर व अन्य याचिकाकर्त्यांनाही सांगितले.- रोमिला थापर यांच्यासह काहींनी ५ जणांच्या अटकेच्या कारवाईला न्यायालयात आव्हान दिले आहे.
‘त्या’ ५ जणांना नजरकैद; १२ सप्टेंबरपर्यंत कायम, पोलिसांनी जबाबदारीने वागावे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 6:33 AM