Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 11:52 AM2020-07-13T11:52:41+5:302020-07-13T12:19:19+5:30
यासह सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती याक्षणी मंदिराची व्यवस्था पाहणार आहे.
कोच्चीः श्री पद्मनाभस्वामी मंदिर व तेथील संपत्तीच्या कारभारासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. देशाच्या अत्यंत प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं त्रावणकोरच्या पूर्वीच्या राजघराण्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. असं म्हणतात की, या मंदिराची संपत्ती 2 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. श्री पद्मनाभस्वामी मंदिरासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोरच्या माजी राजघराण्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती याक्षणी मंदिराची व्यवस्था पाहणार आहे.
२०११मध्ये केरळ उच्च न्यायालयाने पद्मनाभस्वामी मंदिराच्या हक्क आणि संपत्तीबाबत मोठा निर्णय देताना राज्य सरकारला अधिकार दिले होते. केरळ हायकोर्टाच्या या आदेशास माजी त्रावणकोर राजघराण्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 8 वर्षांहून अधिक काळ सुनावणी सुरू होती. एप्रिलमध्ये या प्रकरणातील झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती ललित आणि न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला. अखेर सर्वोच्च न्यायालयानं केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोर घराण्याला दिली आहे.
पद्मनाभस्वामी मंदिर 5000 वर्ष जुने
मंदिर केव्हा बांधले गेले याचा कोणताही पुरावा नाही. इतिहासकार डॉ. एलके रवी वर्मा यांच्या मते, मानवी संस्कृती कलियुगात आली, तेव्हा हे मंदिर सुमारे 5000 वर्षांपूर्वी बांधण्यात आले असावे. तसे मंदिराच्या रचनेच्या दृष्टीने असे मानले जाते की, केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये श्री पद्मनाभस्वामी मंदिर सोळाव्या शतकात त्रावणकोरच्या राजांनी बांधले होते. तेव्हापासून या ठिकाणच्या राजांकडे मंदिराची जबाबदारी होती. सन 1750मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी स्वत: ला पद्मनाभ दास घोषित केले. यासह संपूर्ण राजघर मंदिराच्या सेवेत मग्न झाले. आताही राजघराण्याखालील खासगी ट्रस्ट मंदिराची देखभाल करत आहे.
हेही वाचा
बँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे
धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह
हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन
रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख
टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर
CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार
भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला
...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'