शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 11:52 AM

यासह सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती याक्षणी मंदिराची व्यवस्था पाहणार आहे.

कोच्चीः श्री पद्मनाभस्वामी मंदिर व तेथील संपत्तीच्या कारभारासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. देशाच्या अत्यंत प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं त्रावणकोरच्या पूर्वीच्या राजघराण्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.  असं म्हणतात की, या मंदिराची संपत्ती 2 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. श्री पद्मनाभस्वामी मंदिरासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोरच्या माजी राजघराण्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती याक्षणी मंदिराची व्यवस्था पाहणार आहे.२०११मध्ये केरळ उच्च न्यायालयाने पद्मनाभस्वामी मंदिराच्या हक्क आणि संपत्तीबाबत मोठा निर्णय देताना राज्य सरकारला अधिकार दिले होते. केरळ हायकोर्टाच्या या आदेशास माजी त्रावणकोर राजघराण्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 8 वर्षांहून अधिक काळ सुनावणी सुरू होती. एप्रिलमध्ये या प्रकरणातील झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती ललित आणि न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा ​​यांच्या खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला. अखेर सर्वोच्च न्यायालयानं केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोर घराण्याला दिली आहे. पद्मनाभस्वामी मंदिर 5000 वर्ष जुनेमंदिर केव्हा बांधले गेले याचा कोणताही पुरावा नाही. इतिहासकार डॉ. एलके रवी वर्मा यांच्या मते, मानवी संस्कृती कलियुगात आली, तेव्हा हे मंदिर सुमारे 5000 वर्षांपूर्वी बांधण्यात आले असावे. तसे मंदिराच्या रचनेच्या दृष्टीने असे मानले जाते की, केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये श्री पद्मनाभस्वामी मंदिर सोळाव्या शतकात त्रावणकोरच्या राजांनी बांधले होते. तेव्हापासून या ठिकाणच्या राजांकडे मंदिराची जबाबदारी होती. सन 1750मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी स्वत: ला पद्मनाभ दास घोषित केले. यासह संपूर्ण राजघर मंदिराच्या सेवेत मग्न झाले. आताही राजघराण्याखालील खासगी ट्रस्ट मंदिराची देखभाल करत आहे.

हेही वाचा

बँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे

धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह

हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन

रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख

टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर

CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार 

भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला

...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKeralaकेरळ