शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

पत्रकारास सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; उत्तर प्रदेश सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 7:22 AM

प्रशांत कनोजिया यांनी आक्षेपार्ह शेरेबाजी करणे चुकीचेच आहे,

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत समाजमाध्यमात आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याच्या आरोपावरून अटक केलेले पत्रकार प्रशांत कनोजिया यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांची तत्काळ मुक्तता करावी असे आदेशही दिले आहेत. नागरिकांचे स्वातंत्र्य ही अत्यंत पवित्र गोष्ट असून तिच्याबाबत तडजोड होऊ शकत नाही असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला सुनावले आहेत.

प्रशांत कनोजिया यांनी आक्षेपार्ह शेरेबाजी करणे चुकीचेच आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने या पत्रकाराचेही कान उपटले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. इंदिरा बॅनर्जी, न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. नागरिकांचे स्वातंत्र्य हा त्यांना राज्यघटनेने दिलेला मुलभूत अधिकार असून त्यावर सरकार गदा आणू शकत नाही असेही या खंडपीठाने म्हटले.आपण योगी यांना लग्नाचा प्रस्ताव पाठविला आहे असे सांगणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ प्रशांत कनोजिया यांनी फेसबुक व टिष्ट्वटरवर झळकविला होता. या व्हिडीओमध्ये आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधाने केलेली असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप ठेवून कनोजियांवर हजारीगंज पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दरम्यान, योगी आदित्यनाथ मूर्खासारखे वागत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश