Arvind Kejriwal ( Marathi News ) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना अंतरीम १ जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे. प्रचाराच्या प्रश्नावर अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर येणार आहेत. यावेळी ईडीने अंतरिम जामिनाला विरोध केला तर पुरवणी आरोपपत्रही दाखल केले होते. ईडी केजरीवाल यांना मद्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी ठरवत होती. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी आज आणखी एक महत्त्वाची सुनावणी झाली. के कविता यांच्या जामीन प्रकरणी हायकोर्टाने ईडीला नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
दिल्लीचे वादग्रस्त अबकारी धोरण आणि त्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात के. कविता यांचा जामीन अर्ज कनिष्ठ विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. के. कविता यांनी हाच आदेश उच्च न्यायालयात दिला आणि न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी ईडीचा युक्तिवाद ग्राह्य धरून के कविता यांना जामीन देण्यास नकार दिला. आता के कविता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.