ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ११ - इशरत जहाँ प्रकरणी गुजरात पोलिसांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. डेव्हिड हेडलीने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. वकील एम एल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. इशरत जहाँ प्रकरणी ज्यांच्यावर खटला सुरु आहे त्यांनी योग्य ठिकाणी दाद मागावी असं न्यायालयाने सांगितलं आहे.
मुंबई हल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हीड हेडली याने मुंबई न्यायालयात दिलेल्या माहितीच्या आधारे ही मागणी करण्यात आली आहे. इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित हस्तक आणि सुसाईड बॉम्बर होती अशी माहिती डेव्हीड हेडलीने न्यायालयात दिली होती. सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या या याचिकेत पोलिसांना नुकसानभरपाई देण्याची मागणीदेखील करण्यात आली होती.