नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील पत्रकार गजेंद्रसिंग यांना जिवंत जाळण्यात आल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार, तसेच प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाला (पीसीआय) नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. या प्रकरणी एक राज्यमंत्री आणि अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जनहित याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने उपरोक्त सर्वांना दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर म्हणजे उत्तर मिळाल्यानंतर होईल. कोणत्याही पत्रकाराचा आकस्मिक मृत्यू होत असेल तर न्यायालयाच्या निगराणीखाली तपास करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पत्रकाराच्या हत्येची सुप्रीम कोर्टाकडून दखल
By admin | Published: June 22, 2015 11:48 PM