शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आशेचा किरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 9:57 AM

जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी आशा, प्रगती व एकतेचा जाहीरनामाच : मोदी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसंदर्भातील राज्यघटनेत असलेले ३७० कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. हा केवळ न्यायालयीन निकाल नाही, तर आशेचा किरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

मोदी म्हणाले की, ३७० कलमाबाबत कोर्टाने दिलेला निकाल मजबूत आणि अखंड भारत निर्माण करण्याच्या सामूहिक संकल्पाचे दर्शन घडवितो. हा निकाल म्हणजे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आमच्या बंधू-भगिनींसाठी आशा, प्रगती आणि एकतेचा जाहीरनामाच आहे. जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. केवळ त्यांनाच प्रगतीची फळे चाखायला मिळणार असे नसून कलम ३७०मुळे समाजातील ज्या वंचित, दुर्बल घटकांचे नुकसान झाले त्यांच्यापर्यंतही प्रगतीचे फायदे केंद्र सरकार पोहोचविणार आहे.

 कलम ३७० च्या बाजूने

‘३७० व ३७ अ’ कलम रद्द करण्याचा  निर्णय राज्यघटनेच्या दृष्टीने वैध आहे, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे प्रत्येक भारतीयांना आनंद झाला आहे. ३७० कलम रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ एक नवा अध्याय लिहिला नाही तर आपल्या देशाची अखंडता आणखी मजबूत केली. -राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री

हा राष्ट्रवादी लोकांना आनंद साजरा करण्यासाठी लाभलेला आणखी एक उत्तम क्षण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राजवटीत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देऊन काँग्रेसने घोडचूक केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेचे ३७० कलम रद्द करून हा विशेष दर्जा रद्द केला.-अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्री

 कलम ३७० च्या विरोधात 

हा निकाल फाशीची शिक्षा दिल्यासारखेच आहे. १९४७ साली मुस्लीमबहुल राज्याने भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ठरविण्यात आलेल्या गोष्टींचा या निकालामुळे पाडाव झाला आहे. संसदेमध्ये करण्यात आलेल्या अवैध कृतीला वैध ठरविण्यात आले आहे. 

-मेहबुबा मुफ्ती, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख

निकालामुळे मी निराश झालो; पण निरुत्साही नाही. आम्ही प्रदीर्घ कालावधीच्या लढाईसाठी सज्ज आहोत. आमचा संघर्ष यापुढेही सुरू राहील. ‘दिल ना उमेद तो नही, नाकाम ही तो है, लंब है गम की शाम, मगर शाम ही तो है’ हा फैज अहमद फैज यांनी लिहिलेला शेर आमच्या मनातील भावना नेमकेपणाने व्यक्त करतो. -ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्षहा निकाल दुर्दैवी आहे. हा निकाल प्रत्येकाला जड अंत:करणाने स्वीकारावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देईल, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या भावनांचा सर्वोच्च न्यायालय विचार करेल, अशी आम्हाला आशा होती. मात्र, तसे काही घडले नाही. 

-गुलाम नबी आझाद, डेमोक्रॅटिक आझाद पार्टीचे अध्यक्ष

पाकिस्तान म्हणते... 

३७० कलम रद्द करण्याचा निर्णय वैध आहे या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला कायदेशीर मूल्य नाही. ३७० कलम रद्द करण्याचा भारतातील केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी