शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 2:56 PM

'रस्त्यात मंदिर, दर्गा, गुरुद्वारा, चर्च असूच शकत नाही...'

Supreme Court on Bulldozer Action: सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (1 ऑक्टोबर 2024) बुलडोझर कारवाई प्रकरणाची सुनावणी झाली. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सार्वजनिक सुरक्षा सर्वोपरि आहे. रस्ते, जलकुंभ किंवा रेल्वे रुळांवर अतिक्रमण करणारी कोणतीही धार्मिक इमारत हटविली पाहिजे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, बुलडोझर कारवाई आणि अतिक्रमणविरोधी मोहिमेचे निर्देश सर्व धर्मातील नागरिकांसाठी असतील, असे न्यायालयाने म्हटले.

बेकायदा बांधकामावर कारवाई झालीच पाहिजेसॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या युक्तिवादावर न्यायमूर्ती गवई म्हणाले की, आम्ही धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत आहोत. बेकायदा बांधकाम हिंदूंचे असो वा मुस्लिमांचे...त्यावर कारवाई झालीच पाहिजे. मी मुंबईत न्यायाधीश असताना फूटपाथवरुन बेकायदा बांधकामे हटवण्याचे आदेश दिले होते. परंतु गुन्ह्यात आरोपी असणे, हा त्याचे घर पाडण्यासाठीचा आधार असू शकत नाही, हे समजून घेतले पाहिजे, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

बुलडोझरवरील बंदी कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ते अवमान करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई वसूल केली जाईल. कायद्यानुसार कारवाई न केल्यास पीडितांची मालमत्ता परत करण्यात येईल आणि त्याची भरपाईही दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल केली जाईल. आपण धर्मनिरपेक्ष देश आहोत, आपची मार्गदर्शक तत्त्वे देशातील प्रत्येकासाठी लागू असतील. मंदिर, दर्गा किंवा गुरुद्वारा असो, ते काढून टाकले जाईल. कारवाईपूर्वी त्या कुटुंबाला अन्यत्र राहण्यासाठी 15 दिवसांचा अवधी द्यावा.  पण, रस्ते, पदपथ इत्यादींवर होणाऱ्या बांधकामांना आम्ही कोणतेही संरक्षण देणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयTempleमंदिरMosqueमशिद