नवी दिल्ली : आधार लिंक न केल्यास तुमचा मोबाइल नंबर व बँक अकाउंट बंद होईल असे सांगणारे मेसेज पाठवून ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी संबंधित कंपन्यांना दिले. मोबाइल व बँक अकाउंटला आधार लिंक करण्यास अंतरिम बंदी घालण्यासही न्यायालयाने नकार दिला. मोबाइल नंबर वा बँक अकाउंट आधार लिंक करणे वैध आहे का, याबाबतचा निर्णय घटनापीठ घेईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. अनेक ग्राहकांना कंपन्या मेसेज पाठवत आहे आणि फोनही करीत आहे.
‘आधार’वरून फोन, मेसेज बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 3:03 AM