शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Supreme Court on Demonetisation: ५०० आणि १००० च्या नोटबंदीवर सुप्रीम कोर्टाचे सक्त निर्देश; केंद्र सरकार आणि RBI कडे मागितले सगळे रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 4:35 PM

सुमारे ६ वर्षांपूर्वी केंद्र सरकारनं ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. या नोटाबंदीनंतर देशभरात मोठा गाजावाजा झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं.

नवी दिल्ली-

सुमारे ६ वर्षांपूर्वी केंद्र सरकारनं ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. या नोटाबंदीनंतर देशभरात मोठा गाजावाजा झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. ज्यावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ला १००० आणि ५०० ​​रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या २०१६ सालच्या निर्णयाशी संबंधित रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नोटाबंदीला आव्हान देणाऱ्या ५८ याचिकांवरील एकत्रित सुनावणीदरम्यान बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

केंद्राच्या २०१६ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवताना, न्यायमूर्ती एस ए नझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आरबीआयचे वकील अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. ज्यात ज्येष्ठ वकील पी चिदंबरम आणि श्याम दिमवन यांचाही समावेश होता. 

सुनावणीदरम्यान खंडपीठाने निकाल राखून ठेवल्याचं सांगितलं. भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वकिलांना संबंधित रेकॉर्ड कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या खंडपीठात न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती एएस बोपण्णा, व्ही रामसुब्रमण्यम आणि बीव्ही नागरथना यांचा समावेश आहे. खंडपीठानं पक्षकारांना १० डिसेंबरपर्यंत लेखी सबमिशन देण्याची मुभा दिली. तसंच संबंधित रेकॉर्ड सीलबंद पाकिटात सादर करावे लागणार आहेत. 

न्यायव्यवस्था हातावर हात ठेवून बसू शकत नाहीरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वकिलांनी न्यायालयीन समिक्षा आर्थिक धोरणाच्या निर्णयांवर लागू केली जाऊ शकत नाही असा युक्तिवाद केला होता. त्यावर स्पष्ट शब्दात सुप्रीम कोर्टानं नोटाबंदीचा निर्णय कोणत्या पद्धतीने घेण्यात आला हे तपासण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि न्यायव्यवस्था केवळ आर्थिक धोरणात्मक निर्णय असल्याने हातावर हात ठेवून पाहात बसू शकत नाही, असं सुनावलं आहे. सुनावणीदरम्यान, आरबीआयतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील जयदीप गुप्ता यांनी काळा पैसा आणि बनावट चलनाला आळा घालण्यासाठी नोटाबंदी धोरणाच्या उद्देशाविषयी न्यायालयाला माहिती दिली.

टॅग्स :Note Banनोटाबंदी