ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - आजारी किंवा लोकांसाठी धोकादायक ठरू शकणा-या भटक्या कुत्र्यांना मारण्यास परवानगी दणारा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचे वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिले आहे. कुत्र्यांच्या उपाययोजनासंदर्भात सचिवांना प्रतिज्ञापत्र देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने कोवळ्या बालकांसह अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून या प्रश्नावर सरकारने कठोर पावले उचलावीत यासाठी बराच दबाव टाकण्यात आला होता. त्यानंतर केरळ व मुंबई हायकोर्टाने कुत्र्यांना मारण्याचा निर्णय दिला होता. मात्र अनेक प्राणीमित्र संघटनांनी या निर्णयाला आवाहन दिले होतते. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने मुंबई व केरळ हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत धोकायदायक कुत्र्यांना संपवण्यास परवानगी दिली आहे.