नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून झालेल्या निवडीला आव्हान देणारी याचिका बीएसएफमधून बरखास्त करण्यात आलेले जवान तेज बहादूर यांनी दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देताना ही याचिका फेटाळून लावली आहे.माजी सैनिक असलेल्या तेज बहादूर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज बाद ठरवण्यात आला होता. त्याविरोधात तेज बहादूर यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडीला आव्हान दिले होते. मात्र अलाहाबाद हायकोर्टात त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती.त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दरम्यान, तेज बहादूर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यालायलाचे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रह्मण्यम यांच्या पीठाने १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत तेज बहादूर यांची याचिका फेटाळून लावली.
मोदींच्या निवडीला आव्हान देणाऱ्या माजी सैनिक तेज बहादूर यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
By बाळकृष्ण परब | Published: November 24, 2020 5:03 PM
Tej Bahadur News : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून झालेल्या निवडीला आव्हान देणारी याचिका बीएसएफमधून बरखास्त करण्यात आलेले जवान तेज बहादूर यांनी दाखल केली होती.
ठळक मुद्देमाजी सैनिक असलेल्या तेज बहादूर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होतावाराणसीमधील निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी गतवर्षी १ मे २०१९ रोजी तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होतात्याविरोधात तेज बहादूर यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडीला आव्हान दिले होते.