शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

अर्णबप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि हायकोर्टाला फटकार, नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 3:17 PM

Arnab Ggoswami News : अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबाबतच्या २०१८ मधील एका प्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिजा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

ठळक मुद्देकुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध लादणे हा न्यायाचा अवमान न्यायालयाने आज या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. तर आम्ही निर्विवादपणे विनाशाच्या दिशेने जाऊआरोपांमुळे संबंधित व्यक्तीला तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यापासून वंचित ठेवणार का, हा प्रश्न आहे

नवी दिल्ली - अन्वय नाईक आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. तसेच हायकोर्टालाबाबतही टिप्पणी केली आहे. अर्णबप्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध लादणे हा न्यायाचा अवमान असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबाबतच्या २०१८ मधील एका प्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिजा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.  यावेळी या खंडपीठाने विचारले की, अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेऊन या प्रकरणी चौकशी करण्याची काही गरज होती का. कारण हा व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय आहे. भारतीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण सहनशक्ती आहे आणि राज्य सरकारने अर्णब गोस्वामींच्या टीकाटिप्पणीकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिला.न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, त्यांची (अर्णब गोस्वामी) विचारसरणी कुठलीही असो. किमान मी तरी त्यांचा चॅनेल पाहत नाही. मात्र घटनात्मक न्यायालयाने आज या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. तर आम्ही निर्विवादपणे विनाशाच्या दिशेने जाऊ. तुम्ही या आरोपांमुळे संबंधित व्यक्तीला तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यापासून वंचित ठेवणार का, हा प्रश्न आहे, असेही खंडपीठाने विचारले.यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाबाबतही महत्त्वाची टिप्पणी केली. गेल्या काही काळात आम्ही अशी काही प्रकरणे पाहिली आहेत ज्यामध्ये उच्च न्यायालय लोकांना जामीन देत नाही आहे. तसेच व्यक्तिस्वातंत्र्यांचं रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे, अशा शब्दात उच्च न्यायालयालाही फटकारले.दरम्यान, अर्णब गोस्वामींच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात हजर झालेल वरिष्ठ वकील हरिश साळवे यांना या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली. इंडिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. तसेच तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. यादरम्यान, अर्णब गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाने गोस्वामींचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHigh Courtउच्च न्यायालय